शासकीय तंत्रनिकेतन खामगांव येथे एक दिवसीय उद्योजक जागरूकता शिबीर संपन्न


            शासकीय तंत्रनिकेतन खामगांव ही तांत्रिक शिक्षण प्रदानकरणारी  जिल्ह्यातील अग्रणी संस्था आहे. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाअंतिम वर्षात असतांना कॅम्पस मुलाखतीद्वारे प्लेसमेंट मिळून किंवाउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट मुलाखतीद्वारे चांगल्याउद्योगधंद्यामध्ये नौकरी लागतात. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचा नौकरीकरण्यापेक्षा स्वत:चा उद्योगधंदा सुरू करण्याकडे कल असतो मात्रशास्त्रशुद्ध माहिती नसल्यामुळे स्वत:चा उद्योगधंदा उभारता येणे शक्य होतनाही. स्टार्टअप सुरू करण्याकरिता त्यांना शास्त्रीय माहिती मिळावीम्हणून गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या प्रशिक्षण व आस्थापना

जाहिरात
विभाग व इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) यांच्या संयुक्तविद्यमाने संस्थेतील अंतिम वर्षांच्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय उद्योजकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


            ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेद्वारे १९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी

केली. सकाळी १०.३० वाजता शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळेस

मंचावर संस्थेचे प्राचार्य डॉ समीर प्रभुणे, शिबीर समन्वयक व टीपीओ प्रा

अंकुश दवंड, इंडो जर्मन टूल रूमचे श्री नामदेव गारोडी आणि विषयतज्ञ श्री

व्यंकटेश देशपांडे हे हजर  होते. सदर कार्यक्रमाचे संचालन टीपीओ प्रा

अंकुश दवंड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा गजानन पदमणे यांनी केले.


            या शिबिरात इंडो जर्मन टूल रूमचे श्री नामदेव गारोडी आणि

विषयतज्ञ श्री व्यंकटेश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना “उद्योजकता

विकासाचा परिचय, यशस्वी उद्योजकाचे गुण आणि उद्योगाचे व्यवस्थापन” आणि

“स्टार्ट अपसाठी स्टार्ट अप निवड प्रक्रिया आणि समर्थन प्रणाली” या

विषयांवर विद्यार्थ्यांना यावर सर्वांना अतिशय मनोरंजक पद्धतीने

मार्गदर्शन प्रदान केले. प्रश्नोत्तराच्या वेळेत विद्यार्थ्यांनी

विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे तज्ञाद्वारे देण्यात आली.


सदर कार्यक्रमास १९७ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. “सदर प्रशिक्षण शिबीर

ज्ञानवर्धक असण्यासोबतच मनोरंजकदेखील होते आणि यामुळे आम्हाला उद्योजक

बनण्याची प्रेरणा मिळालेली आहे” असा अभिप्राय उपस्थित विद्यार्थ्यांनी

दिला. कार्यक्रमच्या यशस्वितेकरिता प्रा राजेश मंत्री यांचेसह सर्व

विभागांचे समन्वयक प्रा सोहन चोपडे, प्रा सागर जुमडे, प्रा विजय बांडे,

प्रा डॉ प्रसाद बाहेकर,               श्री विलास इंगळे यांनी अथक

परिश्रम घेतले. सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे इंडो

जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) यांचेतर्फे लवकरच प्राप्त होणार आहेत

असे प्रसिध्दीप्रमुख प्रा राजेश मंत्री यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे

कळविलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post