ना. प्रतापराव जाधव यांनी घेतले मोठी देवीचे दर्शन
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगावआरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी आज खामगाव येथील मोठी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. कोजागिरी पासून सुरू होणाऱ्या शांती उत्सवात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. संपूर्ण भारतात केवळ खामगाव येथे हा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. पर राज्यातून देखील भाविक मोठ्या भक्ती भावाने त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आज उद्योगपती संतोष दिडवणीय यांच्या सह शिवसैनिकांसह सोबत त्यांनी मोठी देवीचे मनोभावे दर्शन घेतले.

Post a Comment