०५ ऑक्टोबरला खामगावात संघाचा शताब्दी उत्सव होणार साजरा

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- जगातील अत्यंत प्रभावी संघटनांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात विजयादशमीपासून होत आहे. १०० वर्षांपूर्वी २७ सप्टेंबर १९२५ विजयदशमीच्या शुभपर्वावर डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली होती. खामगाव नगरचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव रविवार, दि. ०५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सायं. ६.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषदेच्या मैदानावर करण्यात आले आहे. यापूर्वी सायं. ४.३० वाजता खामगाव नगरातील प्रमुख मार्गाने पूर्ण गणवेश व दंडासह भव्य पथसंचलन काढण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा. कवलजीतसिंह नरेंद्रसिंह छाबरा (युवा उद्योजक) तर प्रमुख वक्ते म्हणून मा. गोविंदजी शेंडे, (केंद्रीय सहमंत्री, विश्व हिंदू परिषद) उपस्थित राहणार आहेत. शताब्दी उत्सवासाठी सर्व स्वयंसेवक पथसंचलनात पूर्ण गणवेशात उपस्थित राहणार आहेत. या उत्सवासाठी स्वयंसेवकांनी सहपरिवार तथा खामगाव खामगाव नगरातील मातृशक्ती व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगर संघचालक प्रल्हाद निमकंडे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post