मूकबधिर दिन, सांकेतिक भाषा दिनानिमित्त खामगावात रॅली
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : बुलढाणा येथील माजी मूकबधिर विद्यार्थी संघटना व खामगावच्या निवासी मूकबधिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मूकबधिर दिन आणि सांकेतिक भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शनिवारी सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सांकेतिक भाषेच्या अधिकाराशिवाय मानवी हक्क नाहीत हा या रॅलीचा मुख्य संदेश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.गोपाल सोनी, अमोल अंधारे, प्राचार्य डॉ. प्रकाश जगताप, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष धनेश नेमाडे, तसेच राम माजगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन भाग्यश्री मोरखडे यांनी केले, तर आभार धनेश नेमाडे यांनी मानले. कार्यक्रमाला शशिकांत इंगळे, प्रताप कदम, विजय पवार, शैलेश पवार, संतोष आटोळे, अविनाश पोहरे, कृष्णा धनोकार, तुषार पांडे, अश्विन जाधव यांच्यासह मूकबधिर शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकवंद उपस्थित होते.


Post a Comment