लॉयन्स सेवा सप्ताह अंतर्गत मेंटल हेल्थ व वेल बिईंग या विषयावार चर्चासत्र संपन्न


जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव: लॉयन्स क्लब खामगाव यांचा मेंटल हेल्थ व वेल बिईग विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. मेंटल हेल्थ व वेल बिंईग या विषयांमध्ये जागतिक मेंटल हेल्थ दिवशी जो की 10 ऑक्टोंबर रोजी होता मानसिक स्वास्थ कसे योग्य राखावे या उद्देशाने सेमिनार हा डॉक्टर धनंजय तळवणकर सर यांनी 8 ऑक्टोबर रोजी हर्ष नर्सिंग स्कूल सुटाळा येथे घेतला त्यावेळी तिथे 300 विद्यार्थी व शिक्षक गण लॉयन्स क्लब खामगावचे मेंबर उपस्थित होते. 8 ऑक्टोबर 25 रोजी रात्री 9 वाजता डॉ धनंजय तळवणकर सर ह्यांनी लॉयन मेंबर करिता मेंटल हेल्थ व स्ट्रेस मॅनेजमेंट विषयावर चर्चासत्र केले. त्यावेळी तेथे PDG Ln डॉ अशोक बावस्कर व ZC Ln डॉ सागर अग्रवाल मंचावर उपस्थित होते. 



त्याचप्रमाणे मेंटल हेल्थ विषयावर हर्षल नर्सिंगच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 9 ऑक्टोबर 25 रोजी सुटाळा गावात एक स्किट सादर केले ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस इन्जायटी पेनिक अटॅक अशा प्रकारच्या समस्यावर कशाप्रकारे समोरच्या व्यक्तीला मदत करावी व त्याच्या समस्याचे निवारण कसे करावे याबद्दल माहिती देण्यात आली तसेच हर्ष नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मेंटल हेल्थ वर पोस्टर प्रेसेंटेशन हे 10 ऑक्टोंबर रोजी सादर केले. लॉयन्स क्लब खामगाव यांनी 10 ऑक्टोंबर रोजी मेंबरने स्वतःच्या मोबाईल मध्ये मेंटल हेल्थ जागृती विषयी स्टेटस ठेवून लोकांमध्ये जनजागृती केली व लॉयन्स क्लब खामगावने मेंटल हेल्थ सप्ताह या प्रकारे साजरा केला ह्या प्रकल्पात प्रकल्प प्रमुख म्हणून Ln हर्षद हेड ह्यांनी मार्गदर्शन केले.
कोअशी माहिती लॉयन्स क्लब चे प्रसिध्दी प्रमुख लॉ. डॉ. परमेश्वर चव्हाण, लॉ. श्रमिक जैस्वाल व लॉ. विजय मोरखडे यांनी प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post