प्रभाग एक मध्ये फुलणार आमराई...!
वृक्ष लागवड काळाची गरज - डॉक्टर शेळके
वृक्षारोपण साठी निमित्त कशाला - भाग्यश्री मानकर
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- शहरातील प्रभाग क्रमांक१ मध्ये कोणतेही निमित्त न साधता वृक्ष रोपण करण्यात आले. भविष्यात मुलांना आंब्याचा आस्वाद घेता येईल अशा पद्धतीने जणू आमराईच या बागेत निर्माण होणार आहे. आज मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगर सेविका भाग्यश्री मानकर यांनी आमराई लागवडीचा उपक्रम राबविला. वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचे मत सीओ डॉक्टर प्रशांत शेळके यांनी यावेळी व्यक्त केले तर वृक्षारोपणासाठी निमित्त कशाला, जेव्हा मनात वाटेल तेव्हा प्रत्येकाने वृक्षारोपण केले पाहिजे असे अमूल्य मत माजी नगरसेविका भाग्यश्री मानकर यांनी व्यक्त केले.
यावेळी मुखाधिकारी प्रशांत शेळके, उपमुख्याधिकारी देवकते, भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र धानोकार, प्रमोद अग्रवाल,चंद्रशेखर पुरोहित,विनोद टिकार,सतीश राठी,हेंडपाटील , भगवान बर्डे , महल्ले , जावकर , राजपूत,महाजन, धोंडस, गोहेल, बोके , अशोक मानकर, शिवानीताई कुळकर्णी, श्रद्धाताई धोरण,गोहेल ताई,अवचार ताई, शेळके ताई, भटकर ताई, शेळके ताई, उन्हाळे ताई हे सर्व प्रभागातील उपस्थित होते.
....... .......![]() |
| जाहिरात |




Post a Comment