दिवाळीच्या फरसानकडे आरोग्य व फूड अँड ड्रग्स विभागाचे दुर्लक्ष
खामगावात सर्रास विक्री होत आहेत बोगस तेलापासून बनवलेले फराळ ?
![]() |
| जाहिरात |
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव:- हिंदू धर्मात सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या पाचही दिवशी नागरिकांकडून मोठ्या धुमधडाकात उत्सव साजरा करण्यात येतो. मात्र हाच उत्सव आरोग्यासाठी घातक ठरू नये याची दक्षता आरोग्य तथा अन्न व औषध प्रशासनाने घेणे जरुरीचे आहे. कारण खामगावात बहुतांश खुल्यावर दिवाळीच्या फराळाचे विक्री स्टॉल विनापरवाना लावण्यात आले आहे. मोठमोठ्या जाहिराती करून बोगस तेलात तळलेल्या दिवाळीच्या फराळापासून सावध राहण्याच्या सल्ला नागरिकांकडून देण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने देखील याकडे लक्ष देऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी करत खुल्यावर विक्री होणाऱ्या मालाचे सॅम्पल घेऊन तपासणी करावी अशी मागणी होत आहे.



Post a Comment