राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथ संचलनाचे पुष्प वर्षाव करून केले सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाने केले स्वागत

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज खामगाव तर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यास १०० वर्ष होत आहेत. आज खामगाव येथे विजया दशमी व शस्त्र पूजन निमित्य खामगाव शहरातून निघालेल्या भव्य पथ संचलनाचे पुष्प वर्षाव करून स्वागत करण्यात आले.

जाहिरात

यावेळी श्री चंद्रकांतसेठ आमले यांचे "दिगंबर गोपाळराव आमले" येथे मार्ग क्रमनं करणार्‍या स्वयं सेवकांवर पुष्प वर्षाव करण्यात आला.सोमवंशीय कासार समाजाचे अध्यक्ष वासुदेवराव आमले,चंद्रकांतसेठ आमले,  सचिव जितेंद्र कुयरे, अशोकराव मैंद, नंदकिशोर तांबट, प्रदीपभाऊ माहुरकर, संजयसेठ धोपटे,  अनिलसेठ सातपुते, गोलुभाऊ (यश) आमले, सचिन भाऊ धोपटे, विजय भाऊ कासार, हेमा ताई आमले, ज्योत्स्ना कुयरे, पुष्पा ताई इसोलिकर, वर्षाताई विजय कासार, गोपाल माहुरकर, प्रतीक सूर्यकांत आमले, वेदातं दत्तात्रय आमले यांनी स्वागत केले.

Post a Comment

Previous Post Next Post