लॉयन्स क्लब खामगांव व धन्वंतरी चॅरीटेबल मेडीकल फाऊंडेशनचा उपक्रम
स्व. श्रा.स. बावस्कर गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगांव : लॉयन्स क्लब खामगांव व धन्वंतरी चॅरिटेबल मेडीकल फाऊंडेशनच्या वतीने स्व. श्रा.स. बावस्कर गुरुजी स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या बाराव्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण रविवार दि. ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पीटल सभागृह, जीएसटी ऑफीस समोर, नांदुरा रोड, खामगांव येथे आयोजित कार्यक्रमात संपन्न झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष लॉ. तुषार कमाणी, प्रमुख पाहुणे लॉयन्स प्रांत ३२३४ एच२ चे प्रांतपाल पीएमजेएफ लॉ. अश्विनजी बाजोरिया, प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. सुधाकरजी अजबे गुरुजी, अध्यक्ष टिळक राष्ट्रीय विद्यालय, खामगांव व मा.लॉ.डॉ. सागर अग्रवाल, झोन चेअरपर्सन झोन१ व लॉयन्सचे माजी प्रांतपाल तथा अध्यक्ष, धन्वंतरी चॅरीटेबल मेडीकल फाऊंडेशन एमजेएफ लॉ. डॉ. अशोक बावस्कर, लॉयन्सचे सचिव लॉ. डॉ. गिरिश पवार, कोषाध्यक्ष लॉ. कुणाल भिसे यांची मंचावर उपस्थिती होती.
सरस्वती पूजन, राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व स्व. श्रावण स. बावस्कर गुरुजी यांच्या प्रतिमेस माल्यार्पन, दिप प्रज्वलन व राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लॉयन अध्यक्ष लॉ. तुषार कमाणी यांनी स्वागतपर भाषण केले. प्रकल्प प्रमुख व माजी प्रांतपाल लॉ. डॉ. अशोक बावस्कर यांनी स्व. श्र.स. बावस्कर गुरुजी स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे स्वरूप, निवड प्रक्रिया, मागील अकरा वर्षात वितरित केलेल्या पुरस्काराबाबत माहिती दिली व पुरस्कार प्राप्त सर्व आदर्श शिक्षकांचे अभिनंदन केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
![]() |
| जाहिरात |
बाराव्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी प्राथमिक ग्रामीण विभागातून कु. अस्मिता विठ्ठलराव क्षिरसागर, सहा. अध्यापिका (जि.प. मराठी उच्च प्राथ. शाळा, सुनगांव, ता. जळगांव जा.), प्राथमिक शहरी विभागातून सौ. अंजली प्रविण क्षिरसागर, सहा. शिक्षिका (लोकमान्य बाळगंगाधर टिळक न.प. मराठी प्राथ. शाळा क्र ६, खामगांव), माध्यमिक शहरी विभागातून डॉ. फकीरा भगवान राजगुरु, विषय शिक्षक (जि.प. मराठी उच्च प्राथ. शाळा, पिंप्री माळी, ता. मेहकर), माध्यमिक ग्रामीण विभागातून श्री. देविदास सिताराम वले, सहा. अध्यापक (नवजीवन विद्यालय, रोहिणखेड, ता. मोताळा), अंध, अपंग, कर्णबधीर व आदिवासी विभागातून डॉ. प्रकाश रामभाऊ जगताप, मुख्याध्यापक व वाचा उपचार तज्ञ (निवासी मुकबधीर विद्यालय, खामगांव), सेवानिवत्त विभागातून सेवानिवृत्तीनंतरही सदैव कार्य करणान्या सौ. लता ओंकारसिंग राजपुत, सेवानिवृत्त अध्यापक (सावित्रीबाई फुले माध्य. विद्यालय, सिंदखेड राजा), वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक विभागातून प्रा. लक्ष्मण फुलचंद शिराळे, सहयोगी प्राध्यापक (विदर्भ महाविद्यालय, बुलडाणा) या पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षकांना रु. ५००१ रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देतांना पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी त्यांच्या विशेष सेवाकार्याची उपस्थितांना माहिती दिली व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी झालेल्या फायद्याची योग्य दखल आयोजकांनी घेतल्याबद्दल समाधान व आभार व्यक्त केले. तसेच या पुरस्कारामुळे भावी आयुष्यात अशा प्रकारचे कार्य करत राहण्याची प्रेरणा मिळाल्याचे मनोगत सत्कारार्थी शिक्षक डॉ. फकीरा भगवान राजगुरु, श्री. देविदास सिताराम वले व सौ. लता ओंकारसिंग राजपुत यांनी व्यक्त केले.या जिल्हास्तरीय पुरस्काराचे मुल्यमापन टिळक राष्ट्रीय विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक डॉ. पि.आर. उपर्वट व राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. के. ओ. बावस्कर, बुलडाणा यांनी केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे लॉयन्स प्रांत ३२३४ एच२ चे प्रांतपाल पीएमजेएफ लॉ. अश्विनजी बाजोरिया यांनी आपल्या भाषणातून लॉयन्स क्लब खामगांव व धन्वंतरी चॅरीटेबल मेडीकल फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांना अधिक चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते व या उपक्रमाव्दारे संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील कान्याकोपऱ्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. श्री. सुधाकरजी अजबे गुरुजी, अध्यक्ष टिळक राष्ट्रीय विद्यालय, खामगांव, झोन चेअरपर्सन झोन १ लॉ. डॉ. सागर अग्रवाल यांनी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच शिक्षक हा आयुष्यभर विद्यादानाचे व समाज प्रबोधनाचे कार्य करत राहतो असे सांगीतले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून लॉ. डॉ. अशोक बावस्कर व परिवाराचे वतीने टिळक राष्ट्रीय विद्यालय खामगांव चे जिर्णोध्दारासाठी स्व. मणकर्णाबाई श्रावण बावस्कर यांचे स्मृतीप्रित्यर्थ रु. ५१ हजार देगणी राष्ट्रीय शाळेचे अध्यक्ष श्री. सुधाकरजी अजबे गुरुजी यांना सुपुर्द केली.
कार्यक्रमाचे संचलन अॅड. अनिल व्यास, आभार प्रदर्शन लॉ. डॉ. गिरिश पवार यांनी केले. लॉ.डॉ. सौ. अपर्णा बावस्कर यांनी पसायदान गायीले व तद्नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, त्यांचे कुटुंबीय, लॉयन्स व लिओ क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी माहिती आयोजकांव्दारे लॉयन्स क्लबचे प्रसिध्दी प्रमुख लॉ. डॉ. परमेश्वर चव्हाण, लॉ. श्रमिक जैस्वाल व लॉ. विजय मोरखडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.






Post a Comment