सर्वोत्कृष्ट कामगिरी ची पावती.....

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या तालुका अध्यक्ष पदी पुन्हा राज दिलीपराव टिकार पाटील यांची निवड

जोषपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण


जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :बोरी अडगाव सारख्या छोट्यांच्या ग्रामीण भागातून 90 च्या दशकात जन संघापासून ते भारतीय जनता पार्टी पर्यंत ज्या काळात कोणी संघर्ष कर्याला तयार नव्हतं त्या काळात पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन ग्रामीण भागामध्ये पक्षाचा विस्तार करण्यात मोलाचा वाटा असणारे सर्वांचे परिचित भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक श्री. दिलीरावजी टिकार पाटील. सर्वांना सोबत घेऊन गेले 40 वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात लोकनेते स्व भाऊसाहेब जी फुंडकर यांच्या सोबत एकनिष्ठ राहून लोकसेवेचा व्रत घेत या समाजाची सेवा केली. 

हा त्यांचा वसा आणि वारसा पुढे आणखी ताकदीने पुढे घेऊन जाण्याचे काम त्यांचे चिरंजीव श्री. राज दिलीपराव टिकार पाटील गेल्या 12 वर्षापासून सक्रिय पणे करत आहेत. वडिलांचा वारसा पुढे घेऊन जात असताना सामाजिक  चळवळीत काम करत असताना कॉलेज जीवनात त्यांनी साम्राज्य प्रतिष्ठान ची स्थापना करत मोठ्या प्रमाणात युवकांचे संघटन तयार केला ही बाब लक्षात घेता. गतकाळी राज्याचे माजी कृषी मंत्री लोकनेते स्व भाऊसाहेब जी फुंडकर यांच्या मार्गदर्शनात त्यांना विद्यार्थी आघाडी मध्ये तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करत असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर त्यांचे विद्यार्थ्यांसाठी विविध आंदोलनाची दखल घेत त्यांच्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगाव नगर मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे संघटन कौशल्य ओळखून त्यांना विद्यमान आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके कामगार मंत्री अँड आकाश दादा फुंडकर यांच्या सूचनेनुसार तत्कालीन तालुकाध्यक्ष श्री सुरेश जी गव्हाळ यांनी त्यांना आपल्या कार्यकारणी मध्ये भाजपा विद्यार्थी आघाडी खामगाव तालुका अध्यक्ष पदची जबाबदारी दिली. त्यावेळेस कोरोना सारखं महाभयंकर वातावरण होतं. हे असताना विद्यार्थ्यांसमोर विविध प्रश्न निर्माण झाले होते. त्यावेळी विविध आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्टा केली. सोबत च कोणाचे दवाखान्याचे काम असो, कोणाचे पोलिस स्टेशन चे काम असो किंवा कोणत्या शासकीय कार्यालयात काम असो त्यानी कुठले ही फोटो, व्हिडिओ न काढता त्यांच्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाचे समाधान केले. असेच कार्य करत असताना त्यांच्यावर महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री अँड आकाश दादा फुंडकर व भाजपा सोशल मीडिया सेल चे प्रदेश उपाध्यक्ष श्री. सागर दादा फुंडकर यांच्या सूचनेनुसार तत्कालीन तालुकाध्यक्ष श्री विलासजी काळे यांच्या कार्यकारणी मध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या तालुका अध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. या काळात मोठ्या निवडणुका होणार होत्या. त्या वेळेस मिळालेली ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असताना या कार्यकारणी मध्ये सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन युवा मोर्चाची ग्रामीण भागात एक वेगळी ओळख निर्माण करत असताना लोकसभा निवडणुकीसाठी सन्माननीय खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्यासाठी एक वेगळी प्रचार यंत्रणा राबवत त्यांना खामगाव विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मताधिक्यांचा लीड मिळून देण्यासाठी युवा मोर्चांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.गावा गावात युवा मोर्चा चे नवीन कार्यकर्ते तयार केले. काही ठिकाणी त्यांचे पक्ष प्रवेश करून घेतले.

 हे होत असतानाच अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या खामगाव विधानसभा मतदार संघामध्ये सुद्धा ज्यांनी आपल्यावर अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी दिली. असे सर्वांचे लाडके आकाश दादा फुंडकर यांच्यासाठी न भुतो न भविष्यती अशा प्रकारची प्रचार यंत्रणा राबवत असताना सर्व युवकांना सोबत घेऊन गावोगावी जाऊन जवळपास 104 गावांचा प्रवास करत सर्व ग्रामीण भागातील युवकांमध्ये नवं चैतन्य निर्माण करून सन्मानीय आकाश दादा फुंडकर यांच्या विजयात भाजपा युवा मोर्चा चे यशस्वी अध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. याचा प्रत्यय स्वतः ना. आकाश दादा फुंडकर यांनी त्यांच्या विजयी सभे मध्ये प्रत्यक्षात माझे जिवाभावाचे लहान भाऊ युवा मोर्चा चे अध्यक्ष राज टीकार पाटील व सर्व युवा मोर्चा नी अतिशय चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडत माझ्या विजयश्री खेचून आणला असे त्यांनी गांधी चौकातील सभेमध्ये उल्लेख केला हीच खरी त्यांच्या नेतृत्वगुणाची पावती आहे. 

यानंतर सुद्धा आता पुन्हा एकदा त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरी बद्दल श्री राज टीकार पाटील यांना ना. श्री.आकाश दादा फुंडकर व श्री. सागर दादा फुंडकर यांच्या सूचनेनुसार तालुका अध्यक्ष श्री. श्याम भाऊ पाटेखेडे यांनी त्यांच्या वर पुन्हा एकदा भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिलीत्याच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे व त्यांना विविध क्षेत्रातील मनोवरांकडून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. अशा या युवा नेतृत्वास भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!

Post a Comment

Previous Post Next Post