संजय शिनगारे यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव पदी नियुक्ती

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- भारतीय जनता पार्टी चे खामगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख संजय शिनगारे यांच्याकडे पक्षाने संघटनात्मक दृष्टीने महत्वाची खामगाव जिल्हा चिटणीस (सचिव) पदाची जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी शिनगारे यांनी सलग दोन टर्म भारतीय जनता पार्टी खामगाव शहराध्यक्ष ,बुलढाणा जिल्हा सचिव,विधानसभा निवडणुक प्रमुख अश्या महत्वाच्या जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री नामदार श्री आकाशदादा फुंडकर यांचे आमदार प्रतिनिधी म्हणून ते  शासकीय रुग्णकल्याण नियामक समिती सदस्य सामान्य रुग्णालय खामगाव या पदावर 2014 पासून आजपर्यंत कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्रात प्रसिद्ध श्री तानाजी व्यायाम शाळेच्या संचालक पदावर  लोकनेते स्व. श्री भाऊसाहेबजी फुंडकर यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळापासून ते विद्यमान अध्यक्ष कामगार मंत्री नामदार श्री आकाशदादा फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली श्री तानाजी व्यायाम शाळेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. लोकनेते स्व. श्री भाऊसाहेबजी फुंडकर यांच्या तालमीत तयार झालेले व बाळकडू घेतलेले शिनगारे यांना आजपर्यंत पक्षाने व स्व.श्री भाऊसाहेबजी फुंडकर, नामदार श्री आकाशदादा फुंडकर यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी विश्वासपूर्वक व यशस्वीपणे पार पाडली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post