जयप्रकाश नारायण व नानाजी देशमुख यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी- महादेवराव भोजने
खामगांव - स्थानिक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या कार्यालयात लोकतंत्र सेनानी संघाच्या वतीने जयप्रकाश नारायण व नानाजी देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी समारोहाचे अध्यक्ष माजी जिल्हा संघचालक महादेवराव भोजने व लोकतंत्र सेनानी संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर घोराळे यांच्या हस्ते जयप्रकाश नारायण व नानाजी देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी रामेश्वर घोराळे यांनी जयप्रकाश नारायण व नानाजी देशमुख यांच्या कार्यावर प्रकाश टाकुन आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांची आठवण करणे क्रमप्राप्त ठरते असे उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.
![]() |
| जाहिरात |
कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव भोजने यांनी जयप्रकाश नारायण व नानाजी देशमुख या कर्तृत्ववान विभुतींचा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा. जयप्रकाश नारायण व नानाजी देशमुख याचे कर्तृत्व आजच्या तरुणांनासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. लोकतंत्र सेनानी संघ तर्फे या दोन्ही महामानवांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित केल्याबदद्ल आयोजकांचे कौतुक महादेवराव भोजने यांनी केले.याप्रसंगी बापुसाहेब करंदीकर,अशोक आयलाणी, सुनिल जांभोरकर,सनद देशपांडे, जोशी सर,गणेश घोराळे, ऋषिकेश वाघमारे, आनंद निकाळजे आर्या पाचखेडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


إرسال تعليق