प्रा .धीरज गुणवंतराव वानखडे यांना पी.एच.डी. पदवी — सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव कडून अभिनंदन

शेगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क): सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव येथील सिव्हिल अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख व अ‍ॅकॅडमिक डीन म्हणून कार्यरत असलेले डॉ. धीरज गुणवंतराव वानखडे यांनी “ANN-Integrated Structural Analysis: A Computational Approach to Damper Optimization in Buildings and Bridges” या विषयावर आपला पीएच.डी. संशोधन प्रबंध यशस्वीरीत्या पूर्ण करून कलिंगा विद्यापीठ, रायपूर (Kalinga University, Raipur) येथून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.

या संशोधन प्रबंधाने अभियांत्रिकी क्षेत्रात नव्या कल्पनांना दिशा देत आधुनिक तांत्रिक विश्लेषण आणि डिझाईन क्षेत्रात नवे क्षितिज उघडले आहे.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सागर दादा फुंडकर ,संस्थेचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुलकर्णी, तंत्रनिकेतनच्या प्राचार्या प्रा. प्रीती चोपडे, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post