एका वर्तमानपत्रातील स्तंभलेखकाच्या लिखाणावर ही राज्यातील पहिली पीएचडी!
ज्येष्ठ संपादक राजेश राजोरे यांना पत्रकारितेत पीएचडी प्रदान
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : संपादक राजेश राजोरे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी मासकम्युनिकेशन अँड जर्नालिझम या विषयात विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय 'दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्या प्रहार स्तंभातील लिखाणाचा सामाजिक आशय एक चिकित्सक अभ्यास' असा होता. त्यांनी प्रा. डॉ. सुधीर यशोदा भगवान भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संशोधन कार्य पाच वर्षात पूर्ण केले. या दरम्यान डॉ. सोमनाथ वडनेरे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर पीएचडी संबंधीचे नोटिफिकेशन गुरुवारी विद्यापीठात कुलगुरू प्रो. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते तसेच उपकुलगुरू एस टी इंगळे व संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. सुधीर भटकर, डॉ. सोमनाथ वडनेरे सहकारी संशोधक डॉ. सुभाष तळेले यांच्या उपस्थितीत देण्यात आले. वृत्तपत्रीय लिखाणात स्तंभ लेखनाचे महत्त्व यामधून स्पष्ट झाले असून समस्या समजावून सांगून त्या सोडवण्यासाठी स्तंभलिखाणाचा भरपूर उपयोग केला जाऊ शकतो, असे अधोरेखित झाले आहे. एका वर्तमानपत्रातील स्तंभलेखकाच्या लिखाणावर ही राज्यातील पहिली पीएचडी असून अकोला, बुलढाणा, वाशिम भागात पत्रकारितेतील ही पहिली (Ph.D.) असावी.


Post a Comment