आरोग्य, स्वच्छता आणि आहार जागरूकता कार्यक्रम आणि सॅनिटरी नॅपकिन वितरण कार्यक्रम संपन्न
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगांव - अखिल भारतीय जैन श्वेतांबर सोशल ग्रुप फेडरेशन, खामगांव शाखेचे वतीने अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल येथे आरोग्य, स्वच्छता आणि आहार जागरूकता कार्यक्रम आयोजीत केला. खामगांव येथील पंचशील होमिओपॅथी मेडीकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गुंजन नितेश भंसाली यांनी ११ वी इयत्तेच्या विज्ञान आणि कला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि आरोग्य, स्वच्छता आणि आहार याबद्दल माहिती दिली.
सॅनिटरी नॅपकिन वितरण कार्यक्रम देखील आयोजीत करण्यात आला होता. ज्यामध्ये १०० मुलींना नॅपकिन मिळाले. प्राचार्य उदापूरकर, सोनटक्के मॅडम, बुरानगी मॅडम, महाजन मॅडम, बोरडीकर मॅडम व नारखेडे मॅडम यांची यावेळी उपस्थिती होती. प्रकल्प प्रमुख स्नेहा पिनेश कमाणी आणि भारती संदीप शाह यांनी कार्यक्रमाचे यशस्वीरित्या संचालन केले. कोषाध्यक्ष विरेंद्र डिंपल शाह यांनी आभार मानले. या कार्यक्रमात अखिल भारतीय जैन श्वेतांबर ग्रुप फेडरेशन शाखा खामगांव चे देवेंद्र सपना मुणोत, विरेंद्र डिंपल शाह, नितेश गुंजन भंसाली, निलेश भावना जैन, सपना देवेंद्र मुणोत, गौरी जिमी टिंबडीया, चैताली चेतन खिलोशीया, पूजा शितल नहार, कृतिका देवेन खिलोशीया व भावना कमलेश खिलोशीया उपस्थित होते. वरील माहिती मार्केटींग कॅम्युनिकेशन चेअरपर्सन संजय जया छल्लानी यांनी दिली आहे.


Post a Comment