आरक्षण जाहीर होताच महिला उमेदवारांच्या पतींची झाली धावपळ सुरू...... कोण होणार नगराध्यक्षपती ची चर्चा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच महिला उमेदवारांपेक्षा त्यांच्या पतींचा पुढाकार आता वाढत जाणार आहे. निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सक्रीय झाले आहेत. त्यातच प्रशासनानेही या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे.  नुकतेच राज्यातील नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या खामगाव शहराचेही नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खामगावचे नगराध्यक्षपद आरक्षीत निघाल्याने एक किंवा दोन वेळा सतत नगरसेविका म्हणून निवडूण आलेल्या महिलांची नावे आताचर्चेत आली आहेत. यामध्ये भाजपाच्या भाग्यश्री विक्रम मानकर, स्मिता किशोरआप्पा भोसले ,सौ. संतोषी चंद्रशेखर पुराहित, सौ. रेखा जाधव, माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या सौ. अलकाताई सानंदा, तसेच सौ. भाग्यश्री रोहणकार, यांचे नाव चर्चेत आल्याने खामगावचे नगराध्यक्षपती कोण होणार अशी अशी चर्चा होऊ लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post