पातुर्डा येथील शेतकरी हक्क परिषदेला शेतकरी शेतमजूर महिलांची मोठी उपस्थिती 

संपूर्ण कर्जमाफीसाठी आता आमचा लढा.... माजी मंत्री महादेव जानकर  

  पातुर्डा तालुका संग्रामपूर येथे विविध शेतकरी संघटनेच्या वतीने तसेच राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने आयोजित भव्य शेतकरी हक्क परिषदेला  संपूर्ण जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणावर शेतकरी- शेतमजूर कामगार व महिलांची उपस्थिती होती या शेतकरी हक्क परिषदेला राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते माजी मंत्री महादेवराव जानकर तसेच शेतकरी नेते प्रशांत डिक्कर, शेतकरी संघटनेचे नेते गजानन भांगडे पाटील तर शरद जोशी विचार मंचाचे विठ्ठल पवार सह राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. तोसीब शेख यांची प्रमुख उपस्थिती होती

 यावेळी मान्यवरांनी केंद्र व राज्य शासन शेतकरी विरोधी असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांवर आपल्या भावना व्यक्त केल्या तर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते माजी मंत्री महादेव रावजी जानकर यांनी आपले परखडपणे विचार मांडताना सांगितले की महाराष्ट्र राज्य  कृषीप्रधान राज्य आहे जोपर्यंत शेतकऱी विकसित  नाही तोपर्यंत काहीच खरं नाही आज रोजी त्याचे मरण होत आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसानस  नापिकी अशी परिस्थिती व त्यात शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो भाव नाही त्यामुळे माझा शेतकरी बांधव हा हताश  झाला आहे  दिवाळी सारखा सण आहे पण माझ्या शेतकरी बांधवाची दिवाळी अंधारात आहे तो तणाव ग्रस्त जीवन जगत आहे. त्याचा विचार केंद्र व राज्य सरकारने करून तात्काळ  कर्जमाफी ही दिली पाहिजे आता जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असे त्यांनी सांगितले  या  संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय आता थांबायचं नाही. २८ ऑक्टोबरला शेतकरी कर्जमाफीसाठी मोठ्या संख्येने नागपूरला धडक द्यायची आहे असे आव्हान सर्व शेतकरी संघटनांनी तसेच राष्ट्रीय समाज पक्षाने तसेच नेत्यांनी केले आहे 

Post a Comment

أحدث أقدم