मंगेशने दिले सहा फुटाच्या अजगराला जीवदान
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- खामगावच्या अकोला बायपासवर आढळून आलेल्या सहा फुटाच्या अजगराला सर्पमित्र मंगेश भगतपुरे यांने सर्पमित्र राजेश निळे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवदान दिले. अकोला बायपासवरीलगजानन बाॅडी वन सॉफ येथे काल संध्याकाळी सुमारे सहा फूट लांबीच्या भल्या मोठ्या अजगराने व्हिजिट दिली. दरम्यान सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले यावेळी मंगेश भगतपुरे यांनी या अजगराला आपल्या वश मध्ये करून त्याला पकडले.


إرسال تعليق