उद्योजकतेच्या कल्पनांना नवी दिशा: STC टेक्निकल कॅम्पस, शेगावमध्ये उद्योजकता जागरूकता कार्यशाळा यशस्वी

शेगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क) – सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव येथे इनोव्हेशन अँड एंटरप्रिन्युअरशिप काउंसिल (IEC) आणि MSME टेक्नॉलॉजी सेंटर – इंडो जर्मन टूल रूम, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता जागरूकता कार्यक्रम (Entrepreneurship Awareness Programme – EAP) यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) व विकास आयुक्त (EDP Division) यांच्या प्रायोजकत्वाखाली पार पडला.

ऍडव्हर्टाईस

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुलकर्णी आणि प्रा. प्रिती चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारावर भर देण्याचे मार्गदर्शन केले आणि नवकल्पना प्रत्यक्ष उद्योगात रूपांतरित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन श्री. वेंकटेश देशपांडे आणि श्री. एन. एस. गरोडी यांनी केले. श्री. देशपांडे हे ग्रँडअप टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (GradeUp Technologies Pvt. Ltd.) चे संचालक असून, IIT मुंबई मध्ये इनक्यूबेट झालेल्या 3D प्रिंटिंग स्टार्टअपचे संस्थापक आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना ट्रॅव्हल, टुरिझम, ऑइल अँड गॅस, ऑटोमोबाईल, कार रेंटल इत्यादी क्षेत्रातील व्यवसाय सुरू करण्याच्या अडचणी, उपाय आणि आवश्यक मृदू कौशल्यांविषयी मार्गदर्शन केले.

ऍडव्हर्टाईस

 देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले,“व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त उत्कृष्ट उत्पादन पुरेसे नाही; टिकाऊपणा, प्रभावी संवाद आणि जागतिक दृष्टिकोन असणे अत्यावश्यक आहे.”तसेच त्यांनी सहभागींना कॉर्पोरेट नोकरीतून स्टार्टअप संस्थापक होण्याचा प्रवास, नेटवर्किंग कौशल्ये, गुंतवणूकदारांसमोर कल्पना सादर करण्याचे तंत्र आणि व्यावसायिक इनक्युबेशनचे फायदे याविषयी सखोल माहिती दिली.IEC संस्थेने या कार्यशाळेच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले आणि STC टेक्निकल कॅम्पस च्या स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी अशा आणखी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे विद्यार्थी “नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी देणारे  बनतील.

या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेविषयी जागरूकता निर्माण करणे, नवकल्पनांना यशस्वी उद्योगात रूपांतरित करण्यासाठी दिशा देणे आणि सरकारी योजनांची माहिती देणे हे होते. या कार्यशाळेत १५० हून अधिक विद्यार्थी व भावी उद्योजकांनी उत्साहाने सहभाग घेतला.



IEC टीमचे प्रा मयुरी मोरे, प्रा स्वप्नील महाजन,प्रा शालिनी सावळे व त्यांच्या टीमने संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सागर भाऊ फुंडकर, उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाश दादा फुंडकर यांनी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व आयोजक टीमचे अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم