सेवा ही खरी पूजा! लायन्स क्लब खामगाँव संस्कृतीचा 'सेवांजली' सप्ताह उत्साहात संपन्न; आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर भर
गांधी जयंतीनिमित्त ७ दिवसांत ७ महत्त्वाचे समाजोपयोगी उपक्रम
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाँव: लायन्स क्लब ऑफ खामगाँव संस्कृतीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ ते ०८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित केलेला 'सेवांजली' सेवा सप्ताह नुकताच मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. 'स्वत:मध्ये तो बदल आणा जो तुम्हाला इतरांमध्ये बघायचा आहे' या महात्मा गांधींच्या उदात्त विचारधारेला क्लबने कृतीत उतरवले. या सात दिवसांच्या कालावधीत आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत एकूण सात महत्त्वपूर्ण सेवा प्रकल्प पूर्ण करण्यात आले.या सात दिवसांच्या 'सेवांजली' सप्ताहातील प्रमुख सेवा कार्ये खालीलप्रमाणे:
दिlवसनिहाय सेवा कार्यांचे स्वरूप:
१. पहिला दिवस (०२ ऑक्टोबर) - 'स्वच्छता दूत सन्मान' (गांधी जयंती विशेष):
या दिवशी कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा (घंटा गाडी कर्मचारी) 'स्वच्छता दूत' म्हणून सन्मान करून, त्यांच्या अमूल्य परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
२. दुसरा दिवस (०३ ऑक्टोबर) - नेत्र सेवा व सामान्य आरोग्य तपासणी शिबिर:
लायन्स ज्ञानपीठ स्कूलमधील ४९४ विद्यार्थ्यांचे नेत्र परीक्षण (डॉ. प्रतीक सुरुशे, MS Opthalmologist) आणि जनरल हेल्थ चेकअप (डॉ. निशांत मुखिया) करण्यात आले.
३. तिसरा दिवस (०४ ऑक्टोबर) - मधुमेह (Diabetes) तपासणी शिबिर:
लायन्स ज्ञानपीठ स्कूलच्या ५२ शिक्षकांसाठी विशेष मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले (डॉ. दीपाली सुरुशे, MD Medicine).
४. चौथा दिवस (०५ ऑक्टोबर) - नेत्र व अवयव दान: जीवन ज्योती अभियान:
अवयव दानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व्यापक सामाजिक जागरूकता अभियान राबवण्यात आले. क्लब सदस्यांनी फ्लायर आणि व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे समाजप्रबोधन केले.
५. पाचवा दिवस (०६ ऑक्टोबर) - 'LOVE YOU ZINDAGI' उपक्रम:
पारधी समाज शाळा आणि निवासी मूक-बधिर शाळा, खामगाँव येथील ७५० गरजू मुलांना बिस्किट्स आणि चॉकलेट्सचे वाटप करून त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण व्यतीत करण्यात आले.
६. सहावा दिवस (०७ ऑक्टोबर) - महिला सक्षमीकरण - सेल्फ डिफेन्स व कराटे प्रशिक्षण शिबीर:
श्रीमती सूरजदेवी रामचंद्र मोहता महिला महाविद्यालयातील १९० विद्यार्थिनींना प्रावीन कूड़ो ब्लॅक बेल्ट नेहा नटकुट मॅडम यांनी आत्मसंरक्षण (Self-Defense) आणि कराटेचे मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.
७. सातवा दिवस (०८ ऑक्टोबर) - सन्मान सोहळा:
सप्ताहाच्या समारोपात, शहरातील दोन प्रमुख सामाजिक संस्थांचे (निवासी मूक-बधिर विद्यालय आणि रोटरी गतिमंद स्कूल) अध्यक्ष - श्री डॉ. गोपाल सोनी जी आणि श्री दीपक अग्रवाल जी यांचा विशेष भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

![]() |
| जाहिरात |
क्लबच्या या उपक्रमांमुळे विद्यार्थी, शिक्षक, महिला आणि समाजातील गरजू घटकांना थेट फायदा झाला. विशेषतः महिलांना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे हे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरले.
सामाजिक बांधिलकीची ज्योत तेवत ठेवणाऱ्या लायन्स क्लब खामगाँव संस्कृतीच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशी माहिती क्लब प्रसिध्दी प्रमुख लॉ राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली

إرسال تعليق