श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती साजरा

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : 2 नोव्हेंबर 2025 रोजी श्री संत नामदेव मंदीर, गोपाळ नगर, खामगांव श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची 755 वी जयंती साजरा करण्यात आली.  सकाळी श्रींचा अभिषेक व पुजा अर्चना करण्यात आली. दुपारी महिला मंडळाचे भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सायंकाळी श्रींच्या पालखीची शोभायात्रा गोपाळ नगर परिसरातून काढण्यात आली. यावेळी परिसरातील नागरीकांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढून चाय, पानी व फराळ वाटप करून श्रींच्या पालखीचे स्वागत केले. श्री संत नामदेव मंदीर येथे भजन व आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली.  उपस्थितांना फराळाचे वाटप सुध्दा करण्यात आले.  यावेळी श्री संत नामदेव जयंतीला समाजबांधव, भजनी मंडळ व परिसरातील नागरीकांची उपस्थिती होती.  जयंती निमित्त श्री संत नामदेव मंदीर विद्युत रोषणाईने आकर्षक दिसत होते. श्री संत नामदेव महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्याकरीता श्री संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारक समिती, खामगांव व श्री वैष्णव शिंपी समाज महिला मंडळ, खामगांवच्या पदाधिका·यांनी यांनी अथक परिश्रम घेतले. 

Post a Comment

Previous Post Next Post