बुलढाणा नेत्र सर्जन सोसायटीची नवी कार्यकारिणी घोषित
*दिनांक : २ नोव्हेंबर | स्थळ : बुलढाणा | प्रसंग : कार्तिकी एकादशीचा पावन दिवस*बुलढाणा नेत्र सर्जन सोसायटीची नवीन कार्यकारिणी जाहीर करताना एक भव्य पदग्रहण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ऑफथॅल्मिक सर्जन सोसायटी (MOS) च्या अध्यक्ष डॉ. अनघा हेरूर, डॉ. विरल शहा (VOS) अध्यक्ष, तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ. शिरीष थोरात (माजी अध्यक्ष, MOS), डॉ. प्रीती कामदार सेक्रेटरी एमओएस आणि डॉ. अजय लोहिया कोषाध्यक्ष(MOS) यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा नेत्र सर्जन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुभाष जोशी, सचिव डॉ. मनीष वानखेडे, आणि कोषाध्यक्ष डॉ. विकास बाहेकर* यांनी केले होते. या वेळी जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्रतज्ञ डॉ. वसंतराव चिंचोले, डॉ. केशव मेंढे, तसेच विदर्भ ऑफथॅल्मिक सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. शो न चिंचोले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
डॉ. सुभाष जोशी यांनी आपल्या कार्यकाळातील विविध प्रकल्पांचा आढावा घेतला, तर डॉ. मनीष वानखेडे यांनी मागील चार वर्षांतील सीएमई, प्रशिक्षण शिबिरे, वृक्षारोपण उपक्रम, तसेच गोव्यातील MOS परिषदेतल्या यशस्वी सहभागाचा उल्लेख केला.
पदग्रहण सोहळा —
अध्यक्षपदाची जबाबदारी : डॉ. सुरेखा मेंढे
सचिव : डॉ. प्रफुल्ल ढाके,खजिनदार : डॉ. शैलेश छाजेड : उपाध्यक्ष :डॉ. रवी सावळे
नवीन टीम: डॉ. अनघा हेरूर, डॉ. विरल शहा, डॉ. शिरीष थोरात,डॉ. प्रीती कामदार आणि डॉ. अजय लोहिया.
नव निर्वाचित अध्यक्ष डॉ. सुरेखा मेंढे यांनी आपल्या भाषणात गतवर्षीच्या टीमचे कार्य अत्यंत उत्कृष्ट असल्याचे नमूद करून सर्वांचे अभिनंदन केले. येणाऱ्या काळात “सिग्नेचर प्रोजेक्ट – शालेय दृष्टी तपासणी अभियान” राबवण्याची घोषणा त्यांनी केली. या प्रकल्पाचे चेअरमन डॉ. निलेश टापरे आणि डॉ. जीवने असणार आहेत.तसेच, ‘बॉस टाइम्स’ या पंधरवड्यातून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्राच्या संपादक मंडळाची जबाबदारी डॉ. आनंद झुंजुनवाला, डॉ. अर्चना चौधरी आणि डॉ. मोरवाल यांनी स्वीकारली असून वर्षभर डोळ्यांच्या आजारांबाबत जनजागृती करणारे उपक्रम राबवले जातील. नेत्रपेढी व अवयवदानाबाबतही विशेष जनजागृती करण्यात येणार आहे.
बुलढाणा नेत्र सर्जन सोसायटी स्थापन करण्यामागे डॉक्टर शो न चिंचोले यांचा मोलाचा वाटा असल्याचे सर्वांनी नमूद केले.
या वेळी डॉ. अमोल उगले यांचे नवीन सदस्य म्हणून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन डॉ. जगदीश डुकरे व डॉ. प्रीती डुकरे यांनी केले, तर डॉ. ढाके यांनी आभार प्रदर्शन केले. असे पी आर ओ डॉक्टर प्रतीक सुरोशे नेतृतज्ञ यांनी कळविले आहे


Post a Comment