दैनिक देशोन्नती बुलढाणा जिल्हा आवृत्तीचे संपादक डॉ.राजेश राजोरे यांचा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे सत्कार

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा बुलढाणा तर्फे दैनिक देशोन्नती बुलढाणा जिल्हा आवृत्तीचे संपादक तथा  प्रसिद्ध लेखक डॉ.राजेश राजोरे यांना  बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा तर्फे दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्या प्रहार स्तंभातील सामाजिक आशय, एक चिकित्सक अभ्यास या विषयावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आंतरविद्या शाखेअंतर्गत जनसंवाद आणि पत्रकारिता या विषयात त्यांना डॉक्टरेट ने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल  त्यांच्या खामगाव येथील कार्यालयात त्यांचा शाल, गुलाब बुके व हरिपाठाची पुस्तिका भेट देऊन नुकताच सत्कार करण्यात आला डॉ.राजेश राजोरे हे 41 वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात नेत्र दीपक कार्य करीत आहे. तसेच याप्रसंगी डॉ. राजेश राजोरे यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राष्ट्रीय उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार त्याचप्रमाणे खामगाव येथील प्रसिद्ध उद्योजक तथा फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष श्री विनोद भाऊ डीडवानिया यांना सुद्धा फाउंडेशनचा तापी पूर्ण राष्ट्रीय उत्कृष्ट समाजसेवेचा पुरस्कार जाहीर झालेला असल्याने या दोघेही मान्यवरांना निवड पत्र सुद्धा याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर व उपस्थिताच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष  खामगाव येथील सुप्रसिद्ध उद्योजक श्री विनोदभाऊ डीडवानिया बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख श्री पांडुरंग दैवज्ञ साहेब बुलढाणा जिल्हा समन्वयक श्री बाळूभाऊ ईटणारे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री शंकरराव अनासुने सर बुलढाणा जिल्हा सदस्य श्री अशोकभाऊ अनासने मलकापूर येथील श्री भास्करराव उंबरकर श्री संतोषभाऊ उंबरकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी खामगाव येथील श्री अरविंद शिंगाडे सर यांनासुद्धा उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे निवड पत्र श्री बाळूभाऊ ईटणारे यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आले याप्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم