खामगावात भाजप- काँग्रेस मध्ये सरळ लढत!

खामगावच्या गारव्यात गरम चर्चा

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव- जसे जसे निवडणुकीचे म्हणजेच मतदानाचे दिवस जवळ येत आहेत तसे नगरपालिका निवडणुकीचे धुमशान गल्लीबोळात रंगू लागली असून खामगाव शहरात नगराध्यक्षपदासाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. तुल्यबळ  अधिकचा प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने भाजपचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. अपर्णा सागर फुंडकर तर काँग्रेसचे उमेदवार सौ स्मिता किशोर भोसले यांच्यात लढत होणार असल्याचे बोलले जात आहे.


खामगाव नगरपालिका निवडणूकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. भाजपा कडून सौ. अपर्णा सागर फुंडकर, काँग्रेसकडून सौ. स्मिता किशोर भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सौ. चेतना संजय शर्मा, शिवसेना शिंदे गटाकडून सौ. अश्विनी रवी माळवदे, इंडियननॅशनल लीग कडून पठाण शिरीन वसीम पठाण व बहुजन समाज पार्टीकडून अश्विनी विजय बाघमारे हे उमेदवार असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रत्येकाने आपापली प्रचाराची रणनीती आखली आहे परंतु यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर कंबर कसून उभे आहेत. तळागाळातून उभ्या असलेल्या कोणत्या उमेदवाराला मतदार कौल देतो याबाबतची चर्चा निकालानंतर स्पष्ट होईल.

Post a Comment

أحدث أقدم