कामगारांच्या हक्कांसाठी चार नवीन श्रम संहिता देशभरात लागू – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

जनोपचार न्यूज नेटवर्क मुंबई, दि. २२ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कामगारांसाठी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला असून देशभरात चार नवीन श्रम संहिता पूर्णपणे लागू झाल्या आहेत, अशी माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली.



फुंडकर म्हणाले की, या श्रम संहितांमुळे देशातील आयटी, गिग इकॉनॉमी, असंघटित तसेच इतर क्षेत्रातील सुमारे ४० कोटी कामगारांना किमान वेतन, वेळेवर पगार, ओव्हरटाइम, भविष्य निर्वाह निधी (PF) आणि ग्रॅच्युटी यांसारख्या मूलभूत हक्कांची हमी मिळणार आहे. नव्या कायद्यांमुळे सामाजिक सुरक्षा मजबूत होईल आणि उद्योग क्षेत्रात व्यवसाय सुलभतेलाही चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

“कामगार हिताय, कामगार सुखाय” या भूमिकेतून केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत करताना फुंडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन आणि आभार मानले. त्यांनी सांगितले की या सुधारणांमुळे देशातील कामगार वर्ग अधिक सुरक्षित आणि सशक्त बनेल.

Post a Comment

أحدث أقدم