मित्रांच्या सहकार्यातून साहिल तंबोलेचे सेवाभावी पाऊल
थंडीत कुडकुडणाऱ्या गरजवंतांना दिल्या ब्लँकेट
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :-"किसी एक इंसान की मदद करने से दुनिया तो नहीं बदलने वाली है..लेकिन जिस इंसान की आप मदद करोगे उसकी दुनिया जरुर बदल सकती है" . ही ऊक्ती तसेच मदत करण्याची जिद्द उराशी बाळगून खामगाव येथील साहिल संजय तंबोले याने आपल्या नव तरुण मित्रांच्या मदतीने मदतीचा एक हात पुढे करत गरिब गरजवंतांना ब्लॅंकेटचे वितरण केले. सोबतच त्यांनी भोजन देखील वितरित केले .स्थानिक बस स्टॅन्ड ,रेल्वे स्टेशन व शहरात विविध ठिकाणी उघड्यावर थंडीत कुडकुडत असलेल्या या गरजवंतांना हा मदतीचा हात देण्यात आला. आपल्या खाऊचे पैसे जमा करून गरजवंतांच्या मदतीसाठी पुढे येत साहिल संजय तंबोले ,पियुष नितेश मानकर, वैभव इटे ,ऋषिकेश मानमोळे यांनी आज हा उपक्रम राबविला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






Post a Comment