महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे खामगाव नगर पालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावे - गायगोळ
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : हिंदुजननायक सन्माननिय राजसाहेब ठाकरे यांना अभिप्रेत व जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्याकरीता तसेच शहरी भागाच्या सर्वांगिण विकासाकरीता आगामी खामगाव नगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे मनसे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली व खामगाव मनसे शहराध्यक्ष आनंद गायगोळ यांच्या नेतृत्वात खामगाव नगर परिषदेच्या सर्व जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुर्ण ताकदीनिशी लढविल्या जाणार आहेत.
तरी आपल्या स्थानिक भागातील समस्यांना प्रशाकीय स्तरावर मांडण्याकरीता प्रखर ईच्छाशक्ती असणाऱ्या तसेच भ्रष्टाचारा विरोधात लढा देवून जनतेची सेवा करु ईच्छीणाऱ्या लढावू इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने खामगाव शहरातील विविध प्रभागातील ज्या इच्छुक उमेदवारांना खामगाव शहराच्या सर्वांगिण विकासाकरीता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे खामगाव नगर परिषदेची नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाची निवडणूक लढवायची आहे अशा इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रे व परिचयपत्र मनसे शहराध्यक्ष आनंद गायगोळ व शहर उपाध्यक्ष आकाश पाटील, तालुकाध्यक्ष जयसराम सातव, विनोद इंगळे, तालुका उपाध्यक्ष आकाश वानखडे, सागर भोपळे, सागर हरसुले यांच्याकडे जमा करावी. असे आवाहन मनसे शहराध्यक्ष आनंद गायगोळ यांनी केले आहे.
संपर्क ः मनसे शहराध्यक्ष आनंद गायगोळ -9561675307, आकाश पाटील - 8888308295, जयसराम सातव - 9075784439, विनोद इंगळे -7768912714, आकाश वानखडे - 9053828282 ,सागर भोपळे - 9922892814 , सागर हरसुले -9975963031

Post a Comment