गो. से. महाविद्यालयाचा “रन फॉर युनिटी” मध्ये उस्फुर्त सहभाग

खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क) – विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारा संचालित गो.से. महाविद्यालयाने भारताचे लोहपुरुष व भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमात उस्फुर्त सहभाग नोंदविला. बुलढाणा जिल्हा पोलीस दल व लायन्स क्लब संस्कृतीखामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर, 2025 रोजी रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. धनंजय तळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या स्वयंसेवक व स्वयंसेवकांनी तसेच राष्ट्रीय छात्र सेनाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन देशातील एकताबंधुत्व व देशभक्तीचा मोलाचा संदेश देण्यात आला. प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर  तसेच खामगाव शहराचे ए.एस.पी. मा. श्रेणिक लोढाडी. वाय. एस. पी. मा. प्रदीप पाटीलठाणेदार मा. रामकृष्ण पवार व लायन्स क्लबचे अध्यक्ष मा. आकाश  अग्रवाल प्रामुख्याने विचारमंचावर उपस्थित होते.

रन फॉर युनिटी ची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद मैदानखामगाव ते सुटाळा पर्यंत आणि परत वरील ठिकाणी झाली. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशाच्या एकता व अखंडतेच्या घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी देशातील एकताबंधुत्व व देशभक्तीचा मोलाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डी. टी. अढाऊराष्ट्रीय छात्र सेना अधिकारी प्राध्यापिका रोहिणी धरमकारप्रा. आर. आर. गव्हाळेप्रा. डॉ. विद्याधर आठवरप्रा. कुटेमाटेप्रा. सुभाष वाघप्रा. कायपेल्लीवारप्रा. टापरेप्रा. ढालेप्रा. मोगलप्राध्यापिका पल्लवी खरातप्रा. कदम मॅडमप्रा. डाबरेप्रा. सोनाली कोल्हेप्रा. गौरी पाटीलश्री शैलेश तांबटश्री भोळेश्री अनिल पाटीलश्री गजानन हिवराळेप्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग प्रामुख्याने सहभागी झाले.

विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. सुभाषजी बोबडेसचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे व मंडळाचे सदस्यांचे अनमोल सहकार्य लाभले. या सार्वजनिक दायित्वबंधुत्वएकतासार्वभौमत्व व देशहिताच्या उपक्रमामध्ये गो.से. महाविद्यालय अग्रेसर असल्यामुळे महाविद्यालयाचे सर्वच भागातून कौतुक करण्यात येत आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मो. रागीब देशमुख यांनी दिली आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post