रविवारी सेनि विंग कमांडर अविनाश मुठाळ यांचे व्याख्यान
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव: तरूण भारतच्या शताब्दी व श्री नरकेसरी प्रकाशन लि. नागपूरच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तरूण भारततर्फे आयोजित पर्यावरण संवर्धन उपक्रमांतर्गत रविवार ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वा. येथील कोल्हटकर स्मारक मंदिरमध्ये वृक्षारोपण व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य वक्ते म्हणून राष्ट्रपती पदक प्राप्त सेवानिवृत्त विंग कमांडर अविनाश मुठाळ हे लाभणार असून ऑपरेशन सिंदूर एक शौर्यगाथा, आत्मनिर्भर भारत व पर्यावरण हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग संघचालक चित्तरंजनदासजी राठी, बुलढाणा हे राहणार आहेत. तर, प्रमुख पाहुणे म्हणून खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रा. विजय पुंडे, श्री नरकेसरी प्रकाशन लि. नागपूरचे संचालक श्रीकर सोमण व तरूण भारतचे मुख्य संपादक शैलेष पांडे उपस्थित राहणार आहेत.
तरी, सर्व नागरिक बंधु भगिनींनी सहकुटूंब व्याख्यान श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तरूण भारतच्यावतीने करण्यात येत आहे.

Post a Comment