याला म्हणतात सेवा... सर्व काही मोफत!

 सर्वरोग चिकित्सा व औषधोपचार शिबिराचा ३०० रुग्णांनी घेतला लाभ

 माऊली होमिओपॅथिक हाॅस्पीटलच्या सेवेचे सर्वत्र कौतुक

बुलढाणा ( जनोपचार न्यूज नेटवर्क )  श्री. माऊली होमिओपॅथिक हाॅस्पीटलच्यावतीने आपेगाव (ता. पैठण)  येथे श्री. ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त  कार्तिक काला महोत्सवात आयोजित मोफत सर्वरोग चिकित्सा व औषधोपचार शिबिराचा तीनशेहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. विशेष म्हणजे फक्त तपासणीच नव्हे तर संपूर्ण औषध उपचार देखील करण्यात आल्याने सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

                 श्री. ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठण तालुक्यातील आपेगाव येथे श्री. ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिक काला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.  या महोत्सवात राज्यातील हजारो भाविकांची उपस्थिती असते. यंदा १७ नोव्हेंबर रोजी आयोजित या उत्सवात सहभागी भाविकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने श्री. माऊली होमिओपॅथिक हाॅस्पीटलच्यावतीने मोफत सर्वरोग चिकित्सा व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सलग १० वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा या शिबिराचा तीनशेहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. श्री. माऊली होमिओपॅथिक हाॅस्पीटलचे संचालक डॉ. दुर्गासिंग जाधव यांनी सर्व रुग्णांची तपासणी करुन त्यांना औषधीचे वितरणही मोफत करण्यात आले.  शिबिराचे उद्घाटन चोपदार भगवान महाराज आव्हाळे यांच्याहस्ते संत श्री.ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले. यावेळी  श्री. माऊली होमिओपॅथिक हाॅस्पीटलच्या विविध शाखांचे वैद्यकीय तज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान श्री. माऊली जन्मभूमी संस्थानचे अध्यक्ष अध्यात्म विवेकी हभप. ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर दादा, हभप भानुदास महाराज यांच्यासह राष्ट्रवादी(श.प.)चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष किशोर खोडपे, सुरेश महाराज चौधरी, धनंजय इधाटे, सुनील खोडपे, विवेक कुमावत, हर्षल गुजर, मयुर पाटील यांनीही शिबिराला भेट दिली. 

      शिबिराच्या यशस्वितेसाठी राजू सावंत , गजेंद्रसिंग राजपूत, शशिकांत इंगळे, नाना पवार, प्रेमसिंग मोरे , भगवान जाधव यांनी परीश्रम घेतले. 

Post a Comment

أحدث أقدم