....व्हिजन
महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.स्मिताताई भोसले यांना मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद
खामगाव ः नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ.स्मिताताई किशोर भोसले यांचा प्रत्येक प्रभागात डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे. मतदारांशी संवाद साधून त्यांना विकासाचे व्हिजन सांगत शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मतदान रूपी आशिर्वाद देण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांच्यातील कौशल्य, प्रामाणिकता आणि स्पष्ट भुमिका यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. सर्वसामान्य कुटूंबातील उमेदवार असल्यामुळे सौ.स्मिताताई भोसले यांना नागरिकांची सहानुभूती व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रचारा दरम्यान महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच त्या त्या प्रभागातील नागरिकांचा मोठा सहभाग त्यांचे पारडे जड करीत आहे.


Post a Comment