गुंजकर एज्युकेशन हबमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - गुंजकर एज्युकेशन हब वामन नगर खामगाव येथे काल ७ नोव्हेंबर रोजी तालुका विधी सेवा समिती आणि खामगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्र दिवाणी न्यायाधीश एन. डी. गोळे हे होते तर कार्यक्रमाला प्रामुख्याने  गुंजकर एज्युकेशन हबचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर, सचिव सुरेखा गुंजकर तसेच  नामदेव नारखेडे साहेब विधिज्ञ वकील संघ खामगाव, सौ.ए. एन. भागवत  विधीज्ञ वकील संघ खामगाव तसेच खामगाव वकील संघाचे अध्यक्ष  प्रशांत लाहुडकर आणि कॉलेजचे प्राचार्य सतीश रायबोले मंचावर उपस्थित होते. यावेळी कायदेविषयक सायबर क्राईम बॅड टच आणि लैंगिक अत्याचार याबद्दल सविस्तर मार्गदर्शन दिवाणी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश  गोळे  यांनी केले तर  मोबाईलचा वापर कसा करायचा, मोबाईलचा दुरुपयोग होणार नाही याबद्दल सविस्तर मार्गदर्शन अँड. भागवत यांनी केले. कायद्याच्या सर्व बाबीवर आणि समाजामध्ये होणारे लैंगिक अत्याचार यावर सविस्तर मार्गदर्शन अँड प्रशांत  लाहुडकार यांनी केले. सरते शेवटी गुंजकर एज्युकेशन हबचे अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर यांनी पाल्यावर संस्काराची जबाबदारी आई-वडिलांची आहे. घरात चांगले संस्कार मिळाले तर ते विद्यार्थी शाळा कॉलेज आणि समाजामध्ये चांगल्या प्रकारे वावरतात तसेच शाळा आणि कॉलेज व महाविद्यालयाचे सुद्धा कर्तव्य असून विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार निर्माण झाले पाहिजेत आणि सर्व शिक्षक व प्राध्यापकांनी प्रयत्न केले पाहिजे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला गुंजकर महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक टीचिंग आणि नॉन टीचिंग कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم