जिवंत आईचा मृत्यू दाखवून मुलाने उडवले 10 लाख! जळगाव जामोदमध्ये धक्कादायक प्रकार

जनोपचार न्यूज नेटवर्क : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. जिवंत असलेल्या 75 वर्षीय वृद्ध आईचा मृत्यू दाखवून मुलाने नगरपरिषदेकडून मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं आणि त्याच आधारे आईच्या बँक खात्यातील तब्बल दहा लाख रुपये काढून पसार झाला.

जाहिरात

या प्रकरणात नगरपरिषदेने कोणतीही शहानिशा न करता जिवंत व्यक्तीचा मृत्यू नोंदवल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित मुलाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चुकीने दिलेलं मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم