पत्रकारांच्या नावावर "खाऊ गोबऱ्या" अधिकाऱ्याची दिवाळी साजरी
मागील महिन्यात दिवाळी सण होवून गेला. दरम्यान पत्रकारांना दिवाळीची जाहिरात द्यायचे सांगून दिवाळीपूर्वीच एका विभागाकडून खामगाव शहरासह तालुक्यात असलेल्या १५८ राशन धान्य दुकानदारांकडून पैसे गोळा करण्यात आल्याचे ऐकिवात आहे. जमा झालेली ही रक्कम जवळपास तीन लाखा पेक्षा अधिक असून, एका अधिकाऱ्याने पत्रकारांच्या नावावर दिवाळी साजरी केल्याची चर्चा दबक्या आवाजात महसूल विभागासह शहरात सुरू आहे. दरम्यान राशन दुकानदार देखील या अधिकाऱ्याच्या नावाने बोटं मोडीत असल्याची चर्चा आहे. आता या अधिकाऱ्याकडे असलेली अडमाप संपत्ती देखील चव्हाट्यावर आणण्यात येणार असल्याचे बोलल्या जात आहे.

إرسال تعليق