"मिशन परिवर्तन" स्थागुशाने साखरखर्डा हद्दीत शेतात गांजा बाळगणाऱ्या एकास पकडले: 12,52,100/-रु.चा अंमली पदार्थ गांजा जप्त
जनोपचार न्यूज नेटवर्क बुलढाणा :- पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे संकल्पनेतून जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी "मिशन परिवर्तन" राबविण्यात येत आहे. सदर अनुषंगाने जिल्ह्यात गांजा व ईतर तत्सम अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक, उत्पादन व विक्री करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. नमुद आदेशाप्रमाणे पोनि. श्री. सुनिल अंबुलकर-स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करुन, पथकांना वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे अंमली पदार्थ संबंधाने गोपनीय माहिती काढून कार्यवाही करणेबाबत सुचित केले होते. प्रकरणी, स्था.गु.शा.च्या पथकाने 18/12/2025 रोजी पो.स्टे. साखरखेर्डा हद्दीत गांजा या अंमली पदार्थ संबंधाने कार्यवाही केली असून सविस्तर विवरण खालील प्रमाणे आहे.
![]() |
| वाचा जनोपचार न्यूज नेटवर्क वरील बातमी |
दि.18/12/2025 रोजी स्था.गु.शा. पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, पो.स्टे. साखरखेर्डा हद्दीतील ग्राम मलकापूर पांग्रा शिवारात सुधाकर गायकवाड रा. मलकापूर पांग्रा या ईसमाने शेतामध्ये अवैधरित्या गांजाची लागवड व संगोपन करुन, चोरटी विक्री करण्याच्या उद्ददेशाने गांजा ताब्यामध्ये बाळगून आहे. अशा माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पो.स्टे. साखरखेर्डा हद्दीत सुधाकर गायकवाड यांचे ग्राम रा. मलकापूर पांग्रा शिवारातील शेतामध्ये पंचासमक्ष रेड केली असता, सदर शेतातील कपाशी-तुरीच्या उभ्या पिकामध्ये गांजाच्या झाडांची लागवड, संगोपण व साठवणूक केली असल्याचे दिसून आले. वरुन आरोपी सुधाकर संपतराव गायकवाड वय 65 वर्षे रा. मलकापूर पांग्रा, ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा यांचे ताब्यातून (1) ओलसर गांजाची झाडे 76 किलो 06 ग्रॅम किं. 11,40,900/-रुपये, (2) गांजाची सुकलेली झाडे वजन-05 किलो 560 ग्रॅम किं. 1,11,200/-रु. असा एकूण 12,52,100/-रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुध्द पो.स्टे. साखरखेर्डा येथे अंमली औषधीद्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ अधिनियम कलम 20 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स्टे. साखरखेर्डा करीत आहेत
वरिष्ठ पोलीस अधिकारी मार्गदर्शन व कामगिरी पथक सदरची कार्यवाही मा.श्री. निलेश तांबे- पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर श्री. श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक खामगांव, श्री. अमोल गायकवाड-अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. सुनिल अंबुलकर स्था.गु.शा. बुलढाणा यांचे नेतृत्वात सपोनि. यशोदा कणसे, पोहेकॉ. दिगंबर कपाटे, गजानन दराडे, मपोहेकॉ. वनिता शिंगणे, पोना. विजय वारुळे, पोकॉ. दिपक वायाळ, मंगेश सनगाळे, मनोज खरडे, चापोहेकॉ. समाधान टेकाळे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे पथकाने केली.


إرسال تعليق