खामगावात युवक व युवतींसाठी तीन दिवसीय राजयोग मेडिटेशन कोर्स
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- तणाव मुक्त आणि संतुलित जीवनाची गुरुकिल्ली आहे ध्यान! संयुक्त राष्ट्राने 21 डिसेंबर विश्व ध्यान दिवस घोषित केला आहे या अनुषंगाने स्थानीय प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रायगड कॉलनी या ठिकाणी तीन दिवसीय राजयोग मेडिटेशन कोर्स युवक युवतींसाठी आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर प्रतिदिन वेळ सायंकाळी 5 ते 6 या कालावधीमध्ये आयोजन केले आहे.
![]() |
| जाहिरात |
ध्यान ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्ती आपले मन आणि विचारांवर नियंत्रण ठेवते ध्यान झाला मेडिटेशन असेही म्हटले जाते हे मन आणि आत्म्याला शांत करण्याची एक प्राचीन पद्धत आहे ही मानसिक शारीरिक आणि अध्यात्मिक शांती प्राप्त करण्याचे प्रभावी साधन आहे ध्यानाद्वारे एकाग्रता, निर्णय शक्ती परखण्याची शक्ती, आत्मविश्वास आपल्या आंतरिक शक्तींचा विकास होण्यास मदत होते.


إرسال تعليق