फरार विष्णू ला पोलिसांनी हेरलाच
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- दिड वर्षापासुन गुन्हा करुन फरार असलेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी हेरलाच. तुझंविष्णु भगवान कांबडे रा. चांदमारी खामगांव असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अप.नं. 185 कलम 354,323,504,506 भादवि गुन्हयात दिड वर्षापासुन फरार असलेला आरोपी विष्णु भगवान कांबडे रा. चांदमारी खामगांव हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. पेट्रोलिंग दरम्यान सदर आरोपी पोलिसांना दिसला होता पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शना खाली पोना दिनेशसिंग इंगळे, पोकों राम धामोडे, पोकों विजय सोनोने, पोकों अमरदिपसिंह टाकुर यांनीही कारवाई करण्यात आली.
,


إرسال تعليق