![]() |
| Advt. |
कठोर भूमिकेतील मृद माणूस अर्थात ठाणेदार रामकृष्ण पवार
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात अनेक जण आनंद साजरा करत असताना, समाजातील गरजू घटकांची आठवण ठेवत मानवतेचा आदर्श घालून देणारे कार्य आज एका सच्चा माणसाच्या हातून घडलय. पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार! हे एक असं नाव आहे की कठोर भूमिकेतील मृद माणूस!
डिसेंबरअखेर व जानेवारीच्या सुरुवातीला थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. या कडाक्याच्या थंडीत रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर किंवा उघड्यावर राहणाऱ्या गरिबांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गरजू नागरिकांसाठी ब्लॅंकेट वाटपाचा उपक्रम राबविला.
या उपक्रमांतर्गत खामगाव शहरातील विविध भागांत जाऊन बेघर, वृद्ध, मजूर व अत्यंत गरजू व्यक्तींना उबदार ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. पोलिसांचा खाकी गणवेश केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरताच मर्यादित नसतो तो समाजसेवेचाही प्रतीक आहे हे या कृतीतून स्पष्टपणे दिसून आले. थंडीपासून मिळालेल्या या उबेमुळे अनेक गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान व कृतज्ञतेचे भाव उमटले. त्यामुळे नवीन वर्षाचे अनोखे स्वागत त्यांनी कृतीतून करून दाखवला आहे.
पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांचा हा उपक्रम केवळ मदतीपुरता न राहता समाजाला एक सकारात्मक संदेश देणारा ठरला. नवीन वर्ष म्हणजे फक्त उत्सव, फटाके आणि आनंद नाही तर समाजातील दुर्बल घटकांप्रती संवेदनशीलता दाखवून त्यांच्या जीवनात थोडासा दिलासा देणे हेच खरे नवीन वर्षाचे स्वागत आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
अशा सामाजिक बांधिलकीच्या कार्यामुळे पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत असून, खामगाव शहरात मानवतेची नवी पहाट उगवली असल्याची भावना निर्माण झाली आहे..


إرسال تعليق