खामगांव अर्बन बँकेच्या वतीने नवनिर्वाचीत नगराध्यक्षा सौ. अपर्णाताई फुंडकर यांचा सत्कार व सन २०२६ बँकेचा दिनदर्शिका विमोचन : खामगांव अर्बन बँकेच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा नगराध्यक्षा सौ. अपर्णाताई फुंडकर
![]() |
| बँकेच्या सभासद सौ अपर्णाताई फुंडकर यांच्या सत्कार करतांना अभिमान वाटत आहे. अध्यक्ष प्रा. विजयजी पुंडे |
जनोपचार न्यूज नेटवर्क: खामगांव अर्बन बँक परिवाराच्या वतीने रजत नगरीच्या अध्यक्षा म्हणून गा. सौ. अपर्णाताई सागर फुंडकर यांची प्रचंड मताधिक्याने निवड झाल्याबद्दल सत्कार व रान २०२६ व्या दिनदर्शिक्तत्त। विमोचन सोहळा नवनिर्वाचीत नगराध्यक्षा सौ. अपर्णाताई फुंडकर, जिल्हा संघचालक मा. श्री. बाळासाहेव काळे व मा. संचालक मंडळ तसेच व्यवस्थापन मंडळ सदस्य यांचे शुभहरते दि. ३०/१२/२०२५ रोजी मुख्य कार्यालयाचे माधव सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रा. विजयजी पुंठे होते तर मुख्य अतिथी म्हणून जिल्हा संघचालक श्री. बाळासाहेब काळे व महाराष्ट्र प्रदेश भाजपा सोशल मिडीया सेलचे श्री. सागरदादा फुंडकर उपस्थित होते. नगराध्यक्ष महोदया यांचा बैंकेच्या वतीने संचालिका सौ. विजयाताई राठी, सौ. फुलवंतीताई कोरडे, सौ. कल्पनाताई उपरवट, सौ. मनिषाताई गाटे, सौ. सुवर्णाताई चोथवे व सी.ए. सौ. मिनाताई देशमुख यांनी शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून पारिवारीक सत्कार केला. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. रातिष कुळकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर जाधत, संचालक अॅड. किरण मोकासदार, डॉ. अभय मंडलिक, डॉ. अनिल धनागरे, प्रशांत देशपांडे, डॉ. राजेश मुंदडा, निरज आवंडेकर, योगेश चौविसा, डॉ. मोहन बानोले, संदिप डोळस, विशाल मंत्री, बैंक व्यवस्थापन मंडळ समिती सदस्य घनश्यामदासजी छांगाणी, मोहनराव हसबनिस व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पराग देशमुख तरोच मोठ्या संख्येने बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करतांना नवनिर्वाचीत नगराध्यक्षा सौ. अपर्णाताई फुंडकर यांनी बैंकेच्या सामाजीक कार्यास शुभेच्छा देत निवडणूकीतील सहकार्याबद्दल खामगांव अर्बन बैंक्त परिवाराचे आभार मानले. तर जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे यांनी दिनदर्शिका उपक्रमाची स्तुती करीत पुढील काळात दिनदर्शिका अधिकाधिक आकर्षक होण्याचे दृष्टीने मौलीक सुचना केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. विजयजी पुंहे सांगीतले की, खामगांव अर्थन बैंक सतत सामाजीक बांधिलकी जोपासत असते, येणाऱ्या काळात सुध्दा समाजोपयोगी कार्यात बैंक सहकार्य करेल. तसेच खामगांव अर्बन बैंक मागील १४ वर्षापासून दरवर्षी चांगल्या दर्जाच्या दिनदर्शिक्ता तयार करीत असून ह्या दिनदर्शिकचे सभासद खातेदार, प्रतिष्ठाने शाळा-महाविद्यालये, विविध कार्यालय, हितचिंतकांना मोफत वाटप करीत असते. यावर्षी सुध्दा बैंकेने ५०००० रेग्युलर साईज व २५००० ऑफीस साईज अशा ७५००० दिनदर्शिका तयार केल्या आहेत. बँकेच्या या सामाजीक उपक्रमास मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आमचा उत्साह वाढत असल्याचे सांगीतले. तसेच आपल्या नियोजीत व्यस्त कार्यक्रमातून सत्कार सोहळा व दिनदर्शिका विमोचन कार्यक्रमास वेळ दिला, त्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजु जुनारे यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता हरिवारा उज्जैनकर, सुधीर तळवेलकर, तेहरसिंग भिलाला, प्रकाश कळसकर, दिपक पिवळटकर व सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले

إرسال تعليق