कंत्राटदाराची पत्रकार अजय टॉप यांना जीवे मारण्याची धमकी

पत्रकार हल्ला विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवा- जिल्हाध्यक्ष नितेश मानकर

जनोपचार न्यूज नेटवर्क मलकापूर : विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या मलकापूर शहरात पत्रकारांच्या सुरक्षेचा  प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. बुलढाणा रोडवरील दुभाजक सौंदर्यीकरणाच्या अंदाजे १.५ कोटी रुपयांच्या कामासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने पत्रकार अजय टप यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत त्यांनी मलकापूर शहर पो.स्टे. ला दिलेल्या तक्रारीवरून अक्षय भंसाली व शैलेश मोरे यांचे विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.दरम्यान संबंधित इसमावर पत्रकार विरोधी हल्ला कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवावा अशी मागणी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष नितेश मानकर यांनी विभागाकडे केली आहे.

याबाबत असे की शहरातील बुलढाणा रोडवरील दुभाजक सौंदर्यीकरणाच्या अंदाजे १.५ कोटी रूपयांच्या कामा संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख तथा पत्रकार अजय टप यांनी  दैनिक विश्वजगत वृत्तपत्रातून वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर या कामाचे कंत्राटदार अक्षय भंसाली व शैलेश मोरे यांनी टप यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर अजय टप यांनी सदर प्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल करून संबंधितांवर गुन्हेदाखल करण्याची मागणी केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कंत्राटदार अक्षय भंसाली व शैलेश मोरे या दोघांविरूध्द कलम ३५२, ३(५) बीएनएसनुसार गुन्हा दाखल केला आहे. परंतु पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकाराला आळा घालण्याकरिता पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची निर्मिती झाली असून या कायद्यान्वये गन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.


Post a Comment

أحدث أقدم