खामगाव चे अमित शहा झडकले देशोन्नती च्या चिव चिव मध्ये....

खामगावच्या यशस्वी राजकारणाची धुरा सांभाळत नगरपरिषद निवडणुकीत विजयश्री खेचून आणणारे दिलीप गुप्ता म्हणजेच खामगावचे अमित शहा झळकले देशोन्नतीच्या चिव चिव सदरात...

राजकारणात योग्य नियोजन करुन राजकीय प्रतिस्पर्धीचा करेक्ट कार्यक्रम करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे राजकीय पक्षाला नक्कीच चांगले दिवस येतात. याचा अनुभव खुद जनता आता घेवू लागली आहे. कारण भाजपामध्ये अमित शाह यांचे नाव देशपातळीवर यासाठी घेतल्या जाते. अशाच पध्दतीने स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी नियोजन करून राजकीय विरोधकांना धूळ चारली. योग्य व लायक उमेदवारांना न. प. निवडणुकीत संधी देवून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे, सामाजिक समिकरण त्यांच्यासाठी जुळवून आणणे, कार्यकर्त्यांच्या मनात कसा ताव निर्माण होईल असा माहोल निर्माण करणे, असे कार्य जिल्ह्यात नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाच्या काही व्यक्तींनी केले. अशा व्यक्तींना स्थानिक अमित शाह संबोधल्या जावू लागले. खामगावातही भाजपाचे दिलीप गुप्तांना अमित शाह म्हणून संबोधल्या जात असल्याची चिव... चिव... आहे. असे या सदरामध्ये लिहिण्यात आले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post