मनसे शहर अध्यक्षपदी आकाश पाटील यांची नियुक्ती
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव- महाराष्ट्र नवनिर्माण सेना खामगांव शहर अध्यक्षपदी आकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष (विदर्भ नेते ) राजुभाऊ उंबरकर व बुलडाणा जिल्हा अध्यक्ष अमित देशमुख यांचे आदेशावरुन तालुकाध्यक्ष डॉ. जयेशराव शालीग्राम सातव यांनी आज 23 डिसेंबर 2025 रोजी एका पत्रान्वये सदर नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे व कार्यक्रम निष्ठेने राबवून पक्ष संघटन अधिक मजबूत करावे अशी अपेक्षा पत्रात व्यक्त केली आहे. या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Post a Comment