युगधर्म पब्लिक स्कूल, खामगावच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय तेंग सुडो स्पर्धेसाठी निवड
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : येथील युगधर्म पब्लिक स्कूल, खामगावच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय तेंग सुडो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय, पुणे यांच्या वतीने दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. चालू शैक्षणिक वर्षात युगधर्म पब्लिक स्कूल, खामगावच्या विद्यार्थ्यांनी विविध उंची व वजन गटांमध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.तेंग सुडो क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत खालील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे अक्षदा गवळी, अर्णव देशमुख व कैवल्य शेळके हे विद्यार्थी आता महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय तेंग सुडो स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .

Post a Comment