खामगावच्या अपूर्वा विवेक लकडे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ महिला क्रिकेट संघात निवड
क्रीडा क्षेत्रात 'कलर कोट' मिळवून गुंजकर कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क):तालुक्यातील आवार येथील गुंजकर वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अपूर्वा विवेक लकडे हिची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. या निवडीसह अपूर्वाने मानाचा 'कलर कोट' पटकावला असून, तिच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अपूर्वा लकडे हिने क्रिकेट क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करत विद्यापीठस्तरीय निवड चाचणीत आपले कौशल्य सिद्ध केले. तिची ही निवड आगामी आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सुविधांचा अभाव असूनही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अपूर्वाने हे यश संपादन केले आहे.
अपूर्वाच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारकबहुउद्देशीय संस्थेचेअध्यक्ष, तथा गुंजकर एज्युकेशन हब चे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. अपूर्वाच्या या यशामुळे ग्रामीण भागातील इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार असल्याचे मत क्रीडा प्रेमींनी व्यक्त केले आहे. तिच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल महाविद्यालयातुन परिसरातून तिचे विशेष कौतुक होत असून पुढील वाटचालीस संस्थेच्या वतीनेशुभेच्छा देण्यात आल्या अशी माहिती संस्थेच्या वतीने कळविण्यात येत आहे

Post a Comment