जेसीआय खामगाव सिटीच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न


खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क; जेसीआय खामगाव सिटीच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ २२ डिसेंबर २०२५ रोजी प्रेम लॉन्स, खामगाव येथे अतिशय उत्साहपूर्ण व सन्माननीय वातावरणात पार पडला.

या शुभप्रसंगी JC विनम्र पगारिया यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत JC अभिषेक राठी यांनी सचिव म्हणून तर JC CA हेमंत राठी यांनी खजिनदार म्हणून पदाची शपथ घेतली.

या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून अकोला येथील कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक श्री. पंकज कोठारी उपस्थित होते. तसेच झोन १३ अध्यक्ष JFD सौरभ गट्टाणी, झोन उपाध्यक्ष (रीजन C) JC डॉ. कृष्णन बजाज, झोन उपाध्यक्ष (रीजन D) व IPP  JFM साकेत गोएंका, झोन डायरेक्टर JFD कुणाल राठी आणि JFM प्रणवेश राठी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या प्रसंगी जेसीआय खामगाव सिटीचे संस्थापक अध्यक्ष HGF डॉ. प्रकाश मलू यांचीही उपस्थिती लाभली. त्यांनी नवीन कार्यकारिणीस मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.

याशिवाय माजी अध्यक्ष JC अमरजीत सिंग बग्गा, JC अमोल बाहेकर , JC शशांक कस्तुरे, JC चेतना पाटील, JC चंद्रशेखर पाटील, JC वीरेंद्र शाह, JC आनंद पालीवाल, JC संकेत नावंदर, JFM प्रमोद वाघमारे व JC सुयोग झवर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच जेसीआय खामगाव सिटीचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन अध्यक्ष JC विनम्र पगारिया यांनी आपल्या मनोगतातून नेतृत्व विकास, सामाजिक कार्य व सकारात्मक बदलासाठी जेसीआयच्या मूल्यांनुसार कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचा समारोप सौहार्द, प्रेरणा आणि समाजहितासाठी एकत्रितपणे कार्य करण्याच्या दृढ निश्चयाने झाला.

Post a Comment

أحدث أقدم