नमो मल्टीपर्पज फाऊंडेशन चा उपक्रम
जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक येथे डिजीटल साहित्य व पुस्तकांचे वाटप
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा अंत्रज येथील विद्यार्थ्यांना नमो मल्टीपर्पनज फाऊंडेशन खामगाव यांच्यातर्फे डिजीटल पाटी व मूल्यशिक्षण कथांची पुस्तके यांचे वाटप करणात आले.याप्रसंगी नमो मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. जान्हवीताई कुळकर्णी व सचिव श्री आनंद कुळकर्णी यांच्या हस्ते २ री तील सर्व विद्यार्थ्यांना डिजीटल पाटीचे तसेच शाळेच्या वाचनालयासाठी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. शारदाताई खंडारे, उपाध्यक्ष श्री अनंतराव गावंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. एस. के. वानखडे सर यांनी केले. प्रास्ताविक श्री, विजय गचके (मुख्याध्यापक) यांनी केले. या प्रसंगी सौ. जान्हती कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दील्या. कार्यक्रमास श्री. एम. ही चापे, श्री पी.पी. सावंत, श्री. मडावी, सौ.माला गचके कु बिजागरे, कुः कदम,कु जाधव व पालकवर्ग उपस्थित होते.

إرسال تعليق