जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स, आणि गुंजकर कॉलेज आवर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र मांडवेकर सर यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
तसेच इयत्ता 8वी तील वद्यार्थी सुमित सुरवाडे, 5वी स्वरा जाधव, धनश्री धोटे, अनुष्का भानोसे, अनुष्का पिंगळे, आरुषी इंगळे, प्रीती गावंडे, इयत्ता 10 वी तील प्रगती सुरवाडे, साक्षी डिक्कर इत्यादी विदयार्थ्यांनी तसेच शाळेची शिक्षिका ज्योती मोरे, शिक्षक संतोष अल्हाट,जुमळे यांनी आपल्या भाषण व गीत या माध्यमातून बासाहेबांना श्रद्धांजली दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून श्री रामकृष्जी गुंजकर सरांनी अत्यन्त मोलाचे असे मार्गदर्शन केले कि
आजचा दिवस केवळ स्मरण करण्याचा नाही, तर संकल्पाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर ज्यासाठी संघर्ष केला. त्या मानवी स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, बंधुता आणि समता या मूल्यांना पुन्हा एकदा हृदयात दृढ करण्याचा दिवस आहे. महापरिनिर्वाण म्हणजे त्यांच्या विचारांचे अमरत्व. प्रत्येक पिढीत नवी ऊर्जा निर्माण करणारे त्यांच्या संघर्षाचे तेज आजही अंधाराला चिरत मार्ग दाखवत आहे. अस्पृश्यतेच्या अंधाऱ्या खाईतून बहुजन समाजाला स्वाभिमान, अधिकार आणि ज्ञानमार्गावर उभं करणारी ही महासत्ता आजही प्रेरणादायी आहे.
आपण त्यांच्या विचारांना वंदन करताना, त्यांनी दिलेला संदेश लक्षात ठेवूया. ज्ञान हेच खरे मुक्तीचे साधन आहे आणि संविधान ही दडपलेल्या समूहाची ढाल आहे. या महापरिनिर्वाण दिनी, बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन समता, न्याय आणि मानवी मूल्यांची जपणूक करणारा भारत उभा करण्याचा निर्धार पुन्हा एकदा दृढ करूया.असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तेजश्री इंगळे हिने तर प्रास्ताविक वैष्णवी उमाळे तसेच आभार प्रदर्शन कु. गौरी डवंगे हिने केले
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले अशी माहिती संस्थेच्या वतीने कळविण्यात येत आहे

Post a Comment