सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव येथे महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन

वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था द्वारा संचलित सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव येथे दिनांक ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.  सागर फुंडकर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यात येतात. समता, न्याय, मानवी हक्क आणि संविधानिक मूल्यांची आठवण करून देणारा हा दिनविशेष आहे या मुख्य उद्देशाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत  कुलकर्णी तंत्रनिकेतन प्राचार्या प्रा. प्रीती चोपडे, डॉ. पी. व्हि. पिंगळे यांच्या हस्ते महाविद्यालयामध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार फुले अर्पण करून  विनम्र आदरांजली देण्यात आले. व त्यानंतर प्रा. सुशील हिवराळे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील अन्याय, अस्पृश्यता व विषमता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित भारतीय संविधान त्यांनी देशाला दिले. महापरिनिर्वाण दिन त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा स्मरणदिन म्हणून ओळखला जातो. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन  प्रा. सागर सोनोने व आभार विदयार्थीनी प्रतिनिधी कु. निकिता काळे यांनी केले असून कार्यक्रम यशस्वी संपन्न करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना चे सर्व स्वयंसेवक व कार्यक्रमाधिकारी प्रा. सागर सोनोने व महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. माधुरी क्षीरसागर महाविद्यालयातील शारीरिक व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर फुंडकर यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post