मातोश्री पार्क खामगाव येथील शिवालय मंदिरात ब्रह्माकुमारीज परिवाराची साधना
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क शहरालगत असलेल्या सर्व सुविधा निशी उभे राहत असलेले आदर्श नगर रोड येथील मातोश्री पार्क मधे रविवार दिनांक 11 जानेवारीच्या सायंकाळी ब्रह्माकुमारीज परिवार खामगाव च्या वतीने योग तपस्या साधना करण्यात आली. शिवालय मंदिरात खामगाव सेवा केंद्र संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी शकुंतला दीदी यांचा मार्गदर्शनाखाली विशेष योगभट्टीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमांमध्ये आहार, विहार, योग व संस्कार या विषयांवर मार्गदर्शन करताना उपस्थित मालेगाव सेंटरच्या स्नेहलता दीदी व खामगाव सेंटरच्या शकुंतला दीदी व सुषमा दिदी व गोपाल पाटिल राऊत उपस्थित माता-भगिनी व खामगाव शहरातील सेवाधारी भक्तगण उपस्थित होते.
मालेगाव सेवा केंद्र संचालिका ब्रह्मकुमारी स्नेहलता दीदी व बांधकाम व्यवसाय गोपाल पाटील यांनी मालेगाव वरून खामगावला येत सहभाग नोंदविला. खामगाव सेवा केंद्राच्या ब्रह्मा कुमारी दिव्या दीदींच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्व भाऊ बहिणींसाठी ब्रह्माभोजनाचे आयोजन करण्यात आले होते शिवाचे अतिशय सुंदर मंदिर बांधल्याबद्दल सर्वांनी विशेष कौतुक केले. शकुंतला दीदींनी ब्रह्माकुमारीस परिवारातील सर्व सदस्य उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.


Post a Comment