आदर्श ज्ञानपीठ मध्ये स्वराज जननी माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जन्मोत्सव उत्साही वातावरणात
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारशील विचारांचे स्मरण करणारी व तरुणाईला आत्मबळाचा मंत्र देणारे युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे अवचित्य साधून स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील शिक्षण व संस्कार यांचा संगम साधत आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे दोन्ही युग परिवर्तक महान व्यक्तींची जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजऱ्या करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. रजनीदेवी मोहता मॅडम व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री के.के. राजपूत सर, श्री चव्हाण सर,सौ. संगीता चव्हाण मॅडम,सौ प्रियंका राजपूत मॅडम, सौ ममता महाजन मॅडम यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद, माँ सरस्वती व स्व. विजयाबाई राजपूत मॅडम यांच्या प्रतिमेंचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षिका सौ ममता महाजन मॅडम यांनी केले. त्यांनी जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे आजच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अक्षया इरतकर मॅडम यांनी ओघवत्या व प्रभावी शब्दात केल.यावेळी माता पालकांनी जिजामातांची भूमिका साकारली तर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद तसेच माँ जिजाऊ यांच्या भूमिकेत येऊन संवादात्मक व प्रेरणादायी सादरीकरण केले या सादरीकरणातून संस्कार,स्वराज्य व आत्मबळ यांचे प्रभावी दर्शन घडले.
सोबतच माता-पालकांसाठी आयोजित रांगोळी स्पर्धेत महिला पालकांतर्फे उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित रांगोळ्यांनी शाळा परिसर सुशोभित झाला होता. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांना आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी शिस्त, आत्मविश्वास, आई - वडील तसेच गुरूंची आज्ञापालन व राष्ट्रसेवा ही मूल्ये आत्मसात करावीत असे मार्गदर्शन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप कु. काजल होनवलकर मॅडम यांच्या आभारपर शब्दांनी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिला पालक वर्गाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. त्यानंतर जय जिजाऊ जय शिवराय च्या गगनभेदी शिवगर्जनेत कार्यक्रमाची दिमाखदार सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता प्राचार्य सौ अनिता पळसकर पर्यवेक्षिका सौ प्रियंका राजपूत मॅडम शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका तसेच सर्व शिक्षकवृंद व इतर कर्मचारी वर्ग आदींचे मोलाचे हातभार लागले.


Post a Comment